सुशांत सिंग राजपूत सारख्या गुणी अभिनेत्याची आत्महत्या सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलीय. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नव्या वादाला तोंड फोडले आहे. काल अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे. इंडस्ट्रीने त्याला कायम डावलले असे ती म्हणाली होती. आता कंगनाच्या या टीकेनंतर सुशांतच्या फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनीही बॉलिवूडमधील इंडस्ट्रीतील वाढत्या घराणेशाहीवर प्रहार केला आहे. केवळ इतकेच नाही तर माजी खासदार संजय निरूपम यांनीही बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सवाल उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर बॉलिवूड क्लब, गेट कीपर्स आॅफ बॉलिवूड, डबल फेक, हिपोक्रेटिक असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

#lokmat #sushantsinghrajput #Lokmatcnxfilmy
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber